महिला आयोग अध्यक्षाविनाच,महिला आमदारांचे ठिय्या आंदोलन

March 14, 2013 9:28 AM0 commentsViews: 20

14 मार्च

एकीकडे राज्यात मंहिलांवरचे अत्याचार वाढत चालले. पण दुसरीकडे राज्याच्या महिला आयोगाला मात्र अजूनही अध्यक्ष मिळत नाहीय. स्वतः मुख्यमंत्र्यांनी वारंवार आश्वासन देऊनही हे पद अजून भरण्यात आलेलं नाही. याविरोधात आज शिवसेना आणि भाजपच्या महिला आमदारांनी विधिमंडळाच्या परिसरात आंदोलन केलं. सभागृहाच्या पायर्‍यांवर बसून त्यांनी निदर्शनं केलं.8 मार्चला महिला दिनी महिला अध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यता होती मात्र मुख्यमंत्र्यांनी दुसर्‍या दिवशी घोषणा केली जाईल असं आश्वासनही दिलं होतं मात्र पाच दिवस उलटले अजूनही घोषणा करण्यात आली नाही.

close