शिवसेनेचा पुण्यात शेतकरी मेळावा

December 21, 2008 12:25 PM0 commentsViews: 2

21 डिसेंबर पुणेशिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे जिल्ह्यातील सासवड इथे शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं गेलं. मुंबईवरील अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर शिवसेनेची जाहीर सभा होत आहे. मुंबई हल्ल्यानंतर पुण्यातील या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याची शिवसैनिकांना उत्सुकता होती. मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार-सुशिलकुमार शिंदे दिवसरात्र क्रिकेटसाठी वीज देतात पण शेतक-यांना देत नाही असा आरोप केला. तसेच अजित पवारांनी ठाकरे खानदानाला शेतीविषयी काय कळतं त्याप्रश्नांला प्रत्युत्तर म्हणून पवार पूर्वजापैकी कितीजण क्रिकेटच्या मैदानात जन्मलेले असा सवाल त्यांनी यावेळी अजित पवारांना केला. यावेळी त्यांनी ए. आर. अंतुलेंनाही लक्ष्य केलं.

close