आरोग्य विभागाच्या महिला कर्मचार्‍यावर हल्ल्याचा प्रयत्न

March 14, 2013 7:49 AM0 commentsViews: 8

14 मार्च

गडचिरोली : आरोग्य विभागात काम करणार्‍या एका महिला कर्मचार्‍यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. रात्री ऑफिसला जाताना हा हल्ला करण्यात आला. मात्र या महिलाचे प्रसंगावधान दाखवत सुटका केल्यानं हल्ल्याचा प्रयत्न फसला. सध्या मार्च अखेरची काम उशिरापर्यंत सुरू असल्याने या कर्मचारी ऑफिसमध्ये जात होत्या. NRHM (नॅशनल रूरल हेल्थ मिशन) या योजनेसाठी सध्या मोठ्या प्रमाणावर निधी येत असतो त्यातल्या भ्रष्टाचारावरून हा हल्ला झाल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात येतोय. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असल्याचं गडचिरोली जि.प.चे मुख्याधिकारी रूचेश जयवंशी यांनी सांगितलं

close