इटलीच्या राजदूतांना भारत सोडून जाण्यास मनाई

March 14, 2013 1:17 PM0 commentsViews: 6

14 मार्च

सर्वोच्च न्यायालयाने आज इटलीचे भारतातले राजदूत डॅनिएल मॅन्सिनी यांना नोटीस बजावली आणि देश सोडून जाण्यास मनाई केली. तसंच भारतीय मच्छिमारांच्या हत्येचा आरोप असलेल्या दोन इटालियन खलाशांना भारतात परत आणण्यासंदर्भात 18 मार्चपर्यंत उत्तर देण्यास सांगितलंय. सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्यानं घेतलं असल्याचं ऍटर्नी जनरलनी न्यायालयात सांगितलं. बुधवारी लोकसभेत बोलताना पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनीही यामुळे दोन्ही देशांच्या संबंधांवर परिणाम होऊ शकतो असा इशारा दिला आहे.

close