2011-12 चे वाड्.मय पुरस्कार जाहीर

March 14, 2013 1:32 PM0 commentsViews: 25

14 मार्च

महाराष्ट्र सरकारने 2011-12 साठीचे वाड्.मय निर्मिती पुरस्कार जाहीर केले आहे. मराठीतल्या उत्कृष्ठ वाड्.मय निर्मितीसाठी हे पुरस्कार देण्यात आले आहे. वेगवेगळ्या विषयांवर लेखन केलेल्या 44 लेखंकाचा गौरव करण्यात आला आहे. शिवाय 2 सहलेखकांनाही पुरस्कारात स्थान देण्यात आलंय. त्यात सुरेश द्वादशीवार, दिलीप प्रभावळकर, मुक्ता मनोहर यासारख्या अनेक नावांचा समावेश आहे. पुरस्कारांची रक्कम 50 हजार ते 1 लाख रुपये अशी आहे.

यांना झाले वाड्मय पुरस्कार जाहीर

सुरेश द्वादशीवारलेखक-पत्रकारअनंत काणेकर पुरस्कारपुस्तक – तारांगण

मोनिका गजेंद्रगडकरलेखिकादिवाकर कृष्ण पुरस्कारपुस्तक – शिल्प

मुकुंद टाकसाळेलेखकश्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कारपुस्तक – राधेने ओढला पाय

प्रकाश पवारराजकीय विश्लेषकडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारपुस्तक – समकालीन राजकीय चळवळीनवहिंदुत्ववादी व जात संघटना

मुक्ता मनोहरलेखिकाडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारपुस्तक – नग्नसत्य-बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध

अच्युत गोडबोले आणि माधवी ठाकूरदेसाईलेखकमहात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार पुस्तक – नॅनोदय

अच्युत गोडबोले अर्थतज्ज्ञना.गो.नांदापूरकर पुरस्कार पुस्तक – मनात

भालचंद्र मुणगेकरअर्थतज्ज्ञसी.डी.देशमुख पुरस्कारपुस्तक – आर्थिक सुधारणा आणि विकासाचा मानवी चेहरा

प्रवीण दवणेकवीकर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार पुस्तक – अध्यापन आणि नवनिर्मीती

संध्या नरे-पवारलेखिकाभाई माधवराव बागुल पुरस्कारपुस्तक – डाकीण एक अमानवी प्रथा : शोध आणि अन्वयार्थ

दिलीप प्रभावळकरअभिनेतेराजा मंगळवेढेकर पुरस्कार पुस्तक – बोक्या सातबंडे

कविता महाजनलेखिकाराजा मंगळवेढेकर पुरस्कार पुस्तक – जोआनचे रंग

close