‘परप्रांतीय सुरक्षारक्षक असलेल्या एजन्सीचे परवाने रद्द करणार’

March 14, 2013 4:45 PM0 commentsViews: 43

14 मार्च

स्वसुरक्षेसाठी परराज्यातले लायसन्स असलेले सिक्युरिटी गार्ड्स ज्या एजन्सीकडे असतील त्या एजन्सीजचे लायसन्स रद्द करणार अशी घोषणा गृहमंत्री आर आर पाटील यांनी विधान परिषदेत केलीय. सिक्युरिटी एजन्सीच्या मालकांवर आर्म्स ऍक्टनुसार कारवाई करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वैयक्तिक शस्त्रपरवाने देणं सध्या सरकारनं बंद केलंय. पण, एखाद्या बँक किंवा संस्थेला सुरक्षेसाठी परवाने हवे असतील तर संस्थेच्या नावे अर्ज करता येईल असंही आर आर पाटलांनी स्पष्ट केलंय. बोगस परवाने असणार्‍या सिक्युरिटी गार्डच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या याबद्दलचा प्रश्न आयबीएन-लोकमतनं लावून धरला होता.

close