दुष्काळासाठी सरकार विरोधात ‘स्वाभिमानी’चा संघर्ष मोर्चा

March 14, 2013 3:32 PM0 commentsViews: 6

14 मार्च

पुणे : दुष्काळग्रस्तांच्या प्रश्नांकडे सरकार लक्ष देत नाही. त्यामुळे त्यासंदर्भातल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी आता सरकारविरोधात संघर्ष मोर्चा काढण्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केली आहेत. येत्या 27 तारखेपासून 10 एप्रिलपर्यंत राज्यातल्या तीन ठिकाणांहून सातार्‍यापर्यंत हा मोर्चा निघणार आहे. त्याबरोबरच 31 तारखेला सरकारने दिलेल्या कर्जमाफीच्या आदेशांची आणि वीजबिलांची होळी केली जाणार आहे असंही शेट्टी यांनी सांगितलं. त्याबरोबरच दुधाच्या किमतींमध्ये 5 रुपयांची दरवाढ द्यावी, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी फी माफी द्यावी अशा वेगवेगळ्या मागण्या शेतकरी संघटनेने मांडल्या आहेत. पुण्यामध्ये आज शेतकरी संघटनेच्या कार्यकारणीची बैठक झाली. त्यावेळी हे निर्णय घेण्यात आले. सरकारने केंद्राकडे मदत निधी मागितला. मात्र मिळालेला निधी हा पुरेसा नाही. मागितल्या गेलेल्या निधीबाबत उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये एकमत नाही. पण याचा फटका मात्र शेतकर्‍यांना बसतोय. त्यामुळे हा मोर्चा काढला जाणार असल्याचं ते म्हणाले.

close