देशात आणीबाणी लागू करा – बाळासाहेब ठाकरे

December 22, 2008 4:35 AM0 commentsViews: 1

22 डिसेंबर, मुंबईसध्याचं केंद्रातल सरकार नपुंसक आहे , त्यांमुळ आता देशात आणीबाणीच लागू करावी असं परखड मत , शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. शिवसेनेचं मुखपत्र दैनिक सामनामधल्या मुलाखतीत बाळासाहेबांनी हे मत व्यक्त केलंय. पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईवर केलेला हल्ला ही त्यांची चाचपणी होती.आता त्यांची पुढची हालचाल सैन्याची असेल, असंही बाळासाहेबांनी म्हटलं आहे. सरकार देत असलेल्या धार्मिक सवलतींवर ठाकरी शैलीत टीका करून, आपली प्रकृती ठणठणीत आहे, काळजी करू नका, अस सांगायलाही बाळासाहेब विसरले नाहीत. आपल्याला नजरकैदेत ठेवायची कुणाचीही हिम्मत नसल्याचही शिवसेनाप्रमुखांनी ठणकावून सांगितलय. सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राउत यांनी ही मुलाखत घेतलीय. ती सोमवारपासून तीन भागात प्रकाशित होणार आहे.

close