मनसे नगरसेविका प्रिया गदादेंचं नगरसेवक पद रद्द

March 14, 2013 3:46 PM0 commentsViews: 23

14 मार्च

पुणे : येथील मनसेच्या नगरसेविका प्रिया गदादे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे. प्रिया गदादे यांनी वयाचा खोटा दाखला सादर केला होता. 21 वर्ष पुर्ण झालेली नसतानाही त्यांनी निवडणूक लढवली होती. वयाचा खोटा दाखला केल्याचं सिद्ध झालं असल्याचं सांगत कोर्टाने हा निर्णय घेतला आहे. या वॉर्डमध्ये आता फेर निवडणूक घेण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दरम्यान, या निर्णयाच्या विरोधात हायकोर्टात दाद मागणार असल्याची माहिती मनसेचे महापालिकेतले विरोधी पक्ष नेते वसंत मोरे यांनी दिली आहे.

===================================================

===================================================

close