‘येडा’येतोय भेटीला

March 15, 2013 12:58 PM0 commentsViews: 55

15 मार्च

पुढील महिन्यात 'येडा' नावाचा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. येडा या सिनेमातून आशुतोष राणा पहिल्यांदाच मराठी इंडस्ट्रीत पर्दापण करतोय.अस्खलित हिंदी बोलणाराआशुतोष या चित्रपटात मराठी बोलतांना दिसणार आहे. त्याकरिता आशुतोषने मराठीचे धडेही गिरवले. या चित्रपटात आशुतोषने आप्पा कुलकर्णी नावाची भुमिका साकारली आहे. एका वेगळ्या गेटअप आशुतोष प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. थ्रिलर सायको ड्रामाची थीम असणार्‍या चित्रपटात रिमा लागु, किशोरी शहाणे,सतीश पुळेकर,अनिकेत विश्वासराव,प्रज्ञा शास्त्री,संदेश जाधव हे कलावंतही दिसणार आहे. सध्याच्या दुष्काळी वातावरणात चित्रपटाचा प्रिमिअर थाटामाटात न करता प्रिमिअर करता येणारा लाखो रुपयांचा खर्च दिग्दर्शक किशोर बेळेकर आणि त्यांच्या टीमने मुख्यमंत्री निधीमध्ये देण्याचं ठरवलं आहे. अंदाजे ही रक्कम चार ते पाच लाखांच्या आसपास असणार आहे.

close