उद्धव ठाकरेंची पवारांवर टीका

December 22, 2008 5:21 AM0 commentsViews: 3

22 डिसेंबर, सासवडअद्वैत मेहतादेश पेटला असताना काँग्रेसवाले मात्र उब घेत बसले आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली. ते सासवडच्या शेतकरी मेळाव्यात बोलत होते. उद्धव यांनी यावेळी अजित पवारांनाही टीकेचं लक्ष केलं.उद्धव यांनी शरद पवारांबरोबरच अजित पवारांवरही जोरदार टीका केली. "रात्री हे लोक शेतकर्‍यांना वीज देऊ शकत नाहीत. आणि मी शेतकर्‍यांच्या प्रश्नात लक्ष घातल्यावर मला अजित पवारांनी विचारलं की माझ्या बापजाद्यांनी कधी शेती केली होती का ? मी त्यांना विचारतो की यांचे बापजादे क्रिकेटच्या मैदानावर जन्माला आले होते का ?" या शब्दात त्यांनी अजित पवारांचा समाचार घेतला.शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंच्या सभेला झालेली ही मोठी गर्दी हे उद्धव ठाकरेंच्या सभेचं वैशिष्ट्य ठरलं. एकेकाळी राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेल्या विजय शिवतारे यांना शिवसेनेत खेचून शिवसेनेनं राष्ट्रवादीला खिंडार पाडलं आहे. त्याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसू शकतो. विधीमंडळाचं अधिवेशन चालू असताना, त्यासंबंधी तसच नारायण राणे आणि इतरही विषयांपेक्षा उद्धव यांनी स्थानिक प्रश्न, तसच बारामतीकरांनाच टीकेच लक्ष केल्याच दिसतंय. एकूणच शिवसेनेनं निवडणुकीची जोरदार तयारी चालवल्याचं स्पष्ट झालं आहे.

close