कर्जमाफी योजनेत 61 शेतकर्‍यांना सव्वा कोटींची खैरात

March 15, 2013 11:47 AM0 commentsViews: 4

15 मार्च

कोल्हापूर : केंद्र सरकारने 2008 साली केलेल्या कर्जमाफीमध्ये जिल्ह्यातल्या 61 शेतकर्‍यांना तब्बल सव्वाकोटीची खैरात वाटण्यात आल्याचं समोर आलंय. त्यामुळे जिल्ह्यातल्या सेवा संस्थांच्या सचिवांचे धाबे दणाणले आहेत. सरकारनं केलेल्या कर्जमाफीमध्ये सर्व निकष धाब्यावर बसवून जिल्ह्यात कर्जमाफी गैरप्रकाराने लाटली गेली. येत्या 20 तारखेपासून कर्जमाफीची फेरतपासणी करण्यात येणार आहे. त्यात आता या शेतकर्‍यांची नावं बाहेर येण्याची शक्यता आहे. हे 61 शेतकरी कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत याबाबतही जिल्ह्यात सध्या चर्चा सुरु झाली आहे. तर 61 शेतकर्‍यांना ही खैरात वाटण्यात बँक अधिकार्‍यांचाही हात असल्याची चर्चा सध्या सुरु झालीय. काही दिवसांपूर्वीच आयबीएन लोकमतनं कागल तालुक्यातल्या बड्या धेंड्याची नावं जाहीर केली होती. राजकीय आसरा घेत अनेक शेतकर्‍यांनी चुकीच्या पद्धतीने कर्जमाफी लाटलीय. मात्र त्यातून जो गरजू शेतकरी आहे तो बाजूलाच राहिली. त्यामुळे आता या 61 शेतकर्‍यांवर कारवाई होणार का हे पाहवं लागणार आहे.

close