ऑस्ट्रेलिया दुसर्‍या दिवशी 7 बाद 273 धावा

March 15, 2013 3:21 PM0 commentsViews: 5

15 मार्च

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान मोहालीत तिसरी टेस्ट मॅचचा पहिला दिवस पावसानं वाया गेला, पण दुसर्‍या दिवसाचा खेळ पूर्ण झाला. दुसर्‍या दिवसअखेर ऑस्ट्रेलियानं 7 विकेट गमावत 273 रन्स केले आहेत. ऑस्ट्रेलियानं सलग तिसर्‍या मॅचमध्ये पहिली बॅटिंग घेतली. ईडी कोवान आणि डेव्हिड वॉर्नरनं ऑस्ट्रेलियाला सुरुवातही चांगली करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 139 रन्सची पार्टनरशिप केली. पण रविंद्र जडेजानं वॉर्नरला आऊट करत ही जोडी फोडली. तर पुढच्याच बॉलवर जडेजानं मायकेल क्लार्कचीही विकेट घेत ऑस्ट्रेलियाला सलग दोन धक्के दिले. फिलीप ह्युजेस पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. स्टिव्हन स्मिथ आणि ब्रॅड हॅडिननं इनिंग सावरण्याचा प्रयत्न केला. पण दिवसाच्या तिसर्‍या सत्रात ईशांत शर्मानं ऑस्ट्रेलियाला दणका दिला. इशांत शर्मानं एकाच ओव्हरमध्ये हॅडिन आणि फॉर्मात असलेल्या मोझेस हेन्रिक्सला क्लिन बोल्ड केलं.

close