रोहयोत मजुरांना 90 तर बोगस मजुरांना 200 रुपये मजुरी

March 15, 2013 3:32 PM0 commentsViews: 54

15 मार्च

पुणे : दुष्काळात होरपळणार्‍याच्या हाताला काम मिळावं म्हणून सुरू केलेल्या रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचार झाल्याचं दौंड तालुक्यात उघडकीला आलं आहे. बोगस मजूर दाखवून लाखो रुपये लाटण्यात समोर आला. दौंड तालुक्यातल्या खोर गावात रोजगार हमी योजनेवर प्रत्यक्ष काम करणार्‍या मजुरांना 70 ते 90 रुपये मजुरी मिळाली. तर बोगस मजुरांना 150 ते 200 रुपये मजुरी देऊन सरकारची लाखो रुपयांची लूट करण्यात आली. हा सगळा प्रकार उघडकीला आल्यानंतर ग्रामसेवकाला निलंबित करण्यात आलं. पण अधिकार्‍यांवर मात्र कोणतीही कारवाई झाली नाही.

close