शरीरसंबंधाचं वय सोळा नको -उद्धव ठाकरे

March 16, 2013 1:07 PM0 commentsViews: 67

16 मार्च

नाशिक : सहमतीच्या शरीरसंबंधाचं वय कमी करण्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. ज्ञानेश्वरांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहली, सोळाव्या वर्षी शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला, सावरकरांनी देवी समोर शपथ घेतली,सुधिराम बोस फासावर गेले आणि आज आपल्या देशात सोळाव्या वर्षी शरीरसंबंधला परवानगी द्यायची की नाही यावर चर्चा सुरू आहे. काय कोणत्या दिशेनं चालला हा देश असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. नाशिकमध्ये सुरु असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या संमेलनाचा यंदा रौप्यमहोत्सव आहे. सावरकर अभ्यास मंडळ आणि उर्जा प्रतिष्टान यांच्या संयुक्त विद्यमानं या संमेलनाचं आयोजन कऱण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर आणि अभिनेते शरद पौंक्षे यांच्या उपस्थितीत उद्धाटन झालं त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते.

close