अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून 10 जण ठार

March 16, 2013 10:14 AM0 commentsViews: 3

16 मार्च

बीड : एकीकडे राज्य दुष्काळानं होरपळून निघतंय. त्यातच शुक्रवारी वादळी वार्‍यासह अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या समस्या आणखी वाढवल्या आहेत. राज्यात वीज पडून एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या बीड जिल्ह्यात पाच जणांचा बळी गेला. माजलगाव,केड,शिरूर इथंही पावसाने झोडपून काढले. तर दुष्काळग्रस्त जालना जिल्ह्यातही तुरळक पाऊस झालाय. या अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकाचंही मोठं नुकसान झालंय.

close