‘कोब्रा दंश’, ICICI चे 18 कर्मचारी बडतर्फ

March 16, 2013 10:17 AM0 commentsViews: 16

16 मार्च

अखेर आयसीआयसीआय बँकेने 18 कर्मचार्‍यांना बडतर्फ केलंय. एचडीएफसी, आयसीसीआय आणि एक्सिस बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी काळे पैसे पांढरे करण्याचं रॅकेट चालवत असल्याचा गौप्यस्फोट कोब्रापोस्टनं केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. आयसीआयसीआय पाठोपाठ आता एचडीएफसीनेही कोब्रापोस्टच्या बातमीसंदर्भात कारवाई सुरु केलीय कंपनीने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एका शिष्टमंडळाची नियुकती केली आहे. याशिवाय कोब्रापोस्टने उल्लेख केलेल्या बँकेच्या शाखांच्या कारभाराची सुद्धा चौकशी केली जाणार आहे.

close