शिखर ध’वन’ इनिंग, भारत बिनबाद 283 धावा

March 16, 2013 10:28 AM0 commentsViews: 17

16 मार्च

मोहाली : टेस्टच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडियाने तुफान बॅटिंग केली. ऑस्ट्रेलियाला 408 रन्सवर ऑलआऊट करणार्‍या टीम इंडियाने इनिंगची सुरुवातचं दणक्यात केली. वीरेंद्र सेहवागला वगळल्यानंतर मुरली विजय आणि शिखर धवननं टीम इंडियाची ओपनिंग केली. पण आपल्या टेस्ट पदार्पणातच शिखर धवननं आपला धडाका दाखवून दिला. धवनने फक्त 85 बॉल्समध्ये सेंच्युरी ठोकत आपली निवड सार्थ ठरवली. तर दिवसअखेर धवनने 168 बॉल्समध्ये 2 सिक्स आणि तब्बल 33 फोरसह नॉटआऊट 185 रन्स केले. एकीकडे धवनचा धडाका सुरू होता तर दुसरीकडे मुरली विजयनंही संयमी बॅटिंग करत नॉटआऊट 83 रन्स केले आहेत. तर याअगोदर स्टिव्हन स्मिथ आणि मिचेल स्टार्कच्या तुफान बॅटिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं 408 रन्स केले. स्मिथनं 92 तर स्टार्कनं 99 रन्स केले. भारतातर्फे इशांत शर्मा आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर अश्विन आणि ओझानं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

close