महिलेला त्रास देणारा रोडरोमिओ गजाआड

March 16, 2013 11:35 AM0 commentsViews: 11

16 मार्च

महिलांच्या संरक्षणासाठी सरकानं बनवलेल्या नव्या लैंगिक अत्याचारविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीलाही आता सुरुवात झाली आहे. मुंबईतील एका महिलेला मेरठमध्ये राहणारा तरुण मोबाईलवरून त्रास देत होता. याविरोधात महिलेच्या पतीने पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी नव्या कायद्यातील विनयभंगासंदर्भातील सुधारीत कायद्यानुसार कारवाई करत या तरुणाला बेड्या घातल्यात. या तरुणाला पोलिसांनी दोन दिवसांसाठी पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

close