माटुंग्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार

March 16, 2013 2:35 PM0 commentsViews: 9

16 मार्च

मुंबई : येथे माटुंग्यामध्ये एका 30 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झालाय. माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ शुक्रवारी रात्री ही घटना घडली. महिलेला एकटी बघून पाच नराधम तिच्या घरात घुसले. आणि सामूहिक बलात्कार केला. या पाच आरोपींमध्ये महिलेच्या ओळखीच्या दोन व्यक्ती आहेत. या घटनेनंतर पाचही आरोपी फरार झालेत. महिलेनं तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केलाय. दादर रेल्वे पोलिसांकडे सुरुवातीला तक्रार दाखल करण्यात आली होती. नंतर ती माटुंगा पोलीस स्टेशनकडे हस्तांतरीत करण्यात आली. दोनच दिवसांपूर्वी विलेपार्ले भागात एक 24 वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. एकाच आठवड्यात दोन घटना घडल्यामुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

close