विमानातली आगळी वेगळी मुंज

December 22, 2008 4:39 AM0 commentsViews: 91

22 डिसेंबर, मुंबईमुंज अर्थात व्रतबंधन विधी आणि विमान यांचा काय संबंध असं विचारलं तर दचकू नका. कारण् मुंबईत एक मुंज पार पडली ती चक्क विमानात. दुबईतल्या अल् अदिल सुपरस्टोअरचे मालक धनंजय दातार यांची ही अभिनव कल्पना. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातले दातार कुटुंबीय, खास मुंबईत आले. रोहित दातार याची मुंज झाली ती जेटच्या विमानात. तब्बल दोन तास जमीनीपासून सुमारे 40 हजार फूट उंचावर हा सोहळा झाला. दातार कुटुंबीय या सोहळ्याचा समावेश लिम्का बुकमध्ये नोंदवण्याच्या विचारात आहेत. एकुण काय तर हौसेला मोल नसतं हेच खरं!

close