अंतुलेंच्या विधानावरून संसदेत गोंधळ

December 22, 2008 8:14 AM0 commentsViews: 1

22 डिसेंबर, दिल्लीहेमंत करकरे यांच्या मृत्यूबाबत अंतुले यांनी केलेल्या विधानावर आज संसदेत मोठा हंगामा झाला. लोकसभेत अंतुलेंच्या राजीनाम्याची मागणी करत भाजपच्या सदस्यांनी वेलकडे धाव घेतली आणि अंतुलेविरोधात घोषणा सुरू केल्या. त्यामुळे लोकसभेचं कामकाज एक वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. राज्यसभेतही याच मागणीवरून मोठा गदारोळ झाला. त्यामुळे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. करकरे यांच्या मृत्यूबद्दल वाद निर्माण करणार्‍या अंतुलेंची हकालपट्टी झालीच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका विरोधकांनी घेतली. अंतुले यांनी यापूर्वीच पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केला आहे. पण, युपीए सरकारनं अजून त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.

close