प्रणव मुखर्जींचा पाकला इशारा

December 22, 2008 9:49 AM0 commentsViews: 4

22 डिसेंबर, दिल्लीपाकिस्तानने आपल्या भूमीवरून काम करणा-या अतिरेकी संघटनांवर कारवाई करावी, म्हणून भारत राजनैतिक दबाव वाढवत चालला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दिल्लीत जगभरातल्या सर्व भारतीय राजदूतांची परिषद बोलवण्यात आली आहे. 120 राजदूत एकत्र येण्याची ही पहिलीच वेळ आहे. 26 नोव्हेंबरच्या हल्ल्यांनंतर जगभरातल्या मित्रदेशांकडून पाकिस्तानवर दबाव कसा वाढवता येईल, यावर तेथे चर्चा होत आहे. तसंच भारत-पाक युद्धाची वेळ आली तरी आंतरराष्ट्रीय समुदायाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. यावेळी पश्चिम आशियातल्या आणि चीनसारख्या पाकिस्तानशी मैत्री असलेल्या देशांची काय भूमिका आहे, याची माहिती तिथल्या राजदूतांडून घेतली जाणार आहे. या प्रसंगी बोलताना परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी पुन्हा एकदा संकेत दिले की पाकिस्तानने अतिरेक्यांवर कारवाई केली नाही, तर भारतासमोर लष्करी पर्यायही खुला आहे."आमची अपेक्षा आहे की पाकिस्ताननं दिलेली आश्वासनं पाळावीत. आम्ही आमच्यापुढचे पर्याय बंद केले नाहीत. कारण, आमचे लोक मारले गेलेत. आणि आमच्या देशावर हल्ला झाला आहे" असं ते म्हणाले.

close