दुसर्‍या इनिंगमध्ये भारताची डळमळीत सुरुवात

December 22, 2008 10:10 AM0 commentsViews:

22 डिसेंबर, मोहालीमोहाली टेस्टच्या दुसर्‍या इनिंगमध्ये भारताची डळमळीत सुरवात झाली आहे. तीन विकेट पटापट गेल्यानंतर गौतम गंभीर आणि लक्ष्मण मैदानावर टिकून आहेत. भारताच्या दुसर्‍या इनिंगच्या सुरूवातीलाच विरेंद्र सेहवाग 17 रन्सवर रन आऊट झाला. यानंतर तिसर्‍या क्रमांकावर खेळायला आलेला राहुल द्रविडही फार काळ मैदानावर टिकू शकला नाही. स्टुअर्ट ब्रॉडच्या बॉलिंगवर द्रविड शुन्यावर क्लिन बोल्ड झाला. तेंडुलकरही काही खास करु शकला नाही. अ‍ॅण्डरसनने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्याआधी सकाळच्या सत्रात भारतीय बॉलर्सनी दमदार बॉलिंग करत इंग्लंडच्या तळाची बॅटिंग झटपट गुंडाळली. इंग्लंडची पहिली इनिंग 302 रन्सवर आटोपली. आणि भारतानं पहिल्या इनिंगमध्ये 151 रन्सची दमदार आघाडी घेतली. भारतातर्फे हरभजन सिंगनं सर्वाधिक 4 तर झहीर खाननं 3 विकेट्स घेतल्या.

close