झारखंड न्यायालयाने राज ठाकरेंची याचिका फेटाळली

December 22, 2008 3:48 PM0 commentsViews: 3

22 डिसेंबर झारखंडराज ठाकरे यांना आज झारखंड हायकोर्टानं मोठा धक्का दिलाय.. राज यांनी हायकोर्टात दाखल केलेले दोन्ही अपील काही वेळा पूर्वीच फेटाळली गेली आहेत. बिहारी समाजाबद्दल कथित अपमानास्पद विधान केल्याबद्दल मनसे प्रमुखांविरुद्ध जमशेतपूरच्या दोन कोर्टात केसेस सुरू आहेत. त्या दोन्ही ठिकाणी राज यांच्या विरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यातून दिलासा मिळावा आणि या केसेस मुंबईत हलवण्यात याव्यात, यासाठी राज यांनी झारखंड हायकोर्टाकडे धाव घेतली होती. पण आता तिथेही त्यांना दिलासा मिळाला नाही. नाताळच्या सुट्‌ट्यांनंतर कोर्टं जानेवारीच्या तिस-या आठवड्यात सुरू होतील, तेव्हा राज यांना झारखंडमध्ये जावं लागेल, अशी चिन्हं आहेत.

close