गौतम बुद्धांच्या जीवनावर बॅले

December 22, 2008 10:39 AM0 commentsViews: 7

22 डिसेंबर, मुंबईविनोद घाटगेभारतीय कलेची अस्मिता समजल्या जाणार्‍या नृत्यातून आजपर्यंत अनेक देवतांची चरित्रं आपल्यासमोर मांडली गेली आहेत. गौतम बुद्धांच्या जीवनावरही बॅले बनवला तयार झाला आहे. कथ्थकालय आणि नृत्त्याटीका या संस्थेतर्फे या बॅलेचं सादरीकरण करण्यात आलं. गौतम बुद्धांच आयुष्य अनेक चढउतारांनी भरलेलं होतं. राहुल ते गैातम बुद्धापर्यंतचा प्रवास आजही अनेक कलाकृतींचा विषय बनून राहिला आहे. भगवान बुद्धांचा हाच प्रवास नृत्यातून सादर केला गेला आहे. " बुद्धांच्या जीवनावरच्या अशा पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या आर्टिस्टीक आहेत. नृत्याच्या दृष्टीनं तर आहेतच आहेत. त्यामुळेच हा बुद्धांच्या जीवनावरचा बनवला गेला असल्याचं बॅलेचे लेखक – दिग्दर्शक राम प्रधान यांचं म्हणणं आहे. भगवान गौतम बुद्धांचा प्रवास नृत्यातून साकारणं तितकस सोप कामं नव्हतं. पण बॅलेच्या नृत्यदिग्दशिर्का रंजना फडके यांनी ते आव्हान लिलया पेलंलं आहे. त्याबाबत नृत्यदिग्दर्शिका रंजना फडके सांगतात , " हा बुद्धावरचा बॅले असल्यानं मुख्य पात्र हे बुद्धच होतं. तर मदनाचं दुसरं पात्र होतं. त्या दोन्ही पात्रांसाठी मी कथ्थक आणि भरतनाट्यम् अशा दोन वेगवेगळ्या शैलींचा वापर केला आहे. नृत्यदिग्दर्शन करत असताना अनेक गोष्टींचा, अनेक शक्यतांचा विचार करावा लागला आहे." अशाप्रकारे नृत्यातून गैातम बुद्ध साकारण्याची ही पहिलीचं वेळ आहे. त्यामुळे भगवान बुद्धांच्या बॅलेत काम करणारे कलाकारही आपण काहीतरी वेगळं करतोय या भावनेतून खुश आहेत. आशा खाडीलकरांनी या बॅलेच संगितदिग्दर्शन केलयं. यातील सर्वच गाण्यांना रसिकांनी भरभरुन दाद दिली. आजच्या स्फोटक परिस्थितीत गैातम बुद्धांच जीवन फक्त नृत्यातून पहाण्याची नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवण्याची गरज आहे किमान एवढा संदेश हा बॅले नक्कीचं रसिकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहे.

close