जळगांवमध्ये ज्ञानेश्वरीचं रुपांतरण ब्रेल लिपीत

December 22, 2008 12:26 PM0 commentsViews: 2

22 डिसेंबर, जळगांवप्रशांत बाग संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून सहज सुंदर बोलीतून समाजाला दिशा दिली. याच अध्यात्मातून प्रेरीत झालेला जळगावमधला संजय बडगुजर हा युवक ज्ञानेश्वरीचं ब्रेल मध्ये रूपांतरण करत आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीचा सहवास अंधांनाही लाभणार आहे. इच्छा आणि जिद्दृ असली तर आपल्या व्यंगावर माणूस अगदि लिलया मात करतो याचं संजय चालतंबोलतं उदाहरणच बनला आहे. अंधांना डोळस करणा-या ब्रेललिपीचा यासाठी संजयनं आधार घेतला आहे. ज्ञानेश्वरीचं ब्रेलमधून रुपांतरण करणा-या संजयला वयाच्या दुस-या वर्षांपासून दिसत नाही. संजय सध्या गोदावरी संगीत महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करतोय. लहानपणीचं वडिलांकडून अध्यात्माचं बाळकडू मिळालं. त्याला जे अध्यात्म आपल्याला कळालं त्याचा फायदा सर्व अंधांना व्हावा याच इच्छेनं तो अधात्माचं ब्रेलमध्ये रुपांतरण करण्याकडे वळला. त्याचा शुभारंभ संजय बडगुजर यांनी ज्ञानेश्वरीपासून केला. ब्रेल ज्ञानेश्वरीकार संजय बडगुजर त्याच्या ज्ञानेश्वरी भाषांतराविषयीच्या अनुभवाविषयी सांगतो, " ज्ञानेश्वरी ही प्रत्येकानं आचरणात आणावी अशीच आहे. मानवी हक्कांचं महत्त्व या ज्ञानेश्वरीत सांगितलं आहे. आजचं जगातलं दहशतीचं वातावरण पाहता सगळ्यांना ज्ञानेश्वरीची गरज भासू लागली आहे. " पाच वर्षांपासून संजयचं हे काम सुरू आहे. अत्तापर्यंत या ब्रेल ज्ञानेश्वरीच्या पाच अध्यायांचं रूपांतरण पूर्ण झालयं. आणि या कामात कुटुंबाबरोबर त्याला साथ मिळालीये ती त्याच्या पत्नीची. ब्रेल ज्ञानेश्वरी नंतर रामायणंचंहि ब्रेल रुपांतरण संजयला करायचं आहे. प्रत्येक डोळस व्यक्तीनं सुध्दा ज्ञालेश्वरांनी रचलेली ज्ञानेश्वरी वाचावी इतकं सार त्या ज्ञानेश्वरीत आहे: पण अंधांना सुध्दा त्रानेश्वरी वाचता यावी हा प्रयत्न केलांय संजय बडगुजर याने केला आहे. स्वत: अंध असूनही अंधांनासुध्दा एक डोळस दृष्टिकोन देण्याचा त्याचा हा प्रयत्न नक्कीच प्रंशसनीय आहे.

close