विदर्भात होतंय स्ट्रॉबेरीचं उत्पादन

December 22, 2008 12:35 PM0 commentsViews: 16

22 डिसेंबर, अकोलाजयेश जगड विदर्भ कायम चर्चेत राहिला आहे तो शेतकर्‍यांच्या आत्महत्येमुळे. पण हाच विदर्भ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ते स्ट्रॉबेरीच्या उत्पदनानं. विदर्भात फक्त कापूस, तूर, ज्वारीच नव्हे तर स्ट्रॉबेरीचं उत्पादनही शक्य करून दाखवलं आहे. ही किमया केली आहे एका तरुण शेतकर्‍यानं. राजेंद्र रंदे हे त्या तरुण शेतक-याचं नाव आहे.विदर्भातल्या शेतकर्‍यांना सतत नापिकी, नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ अशा परिस्थितीला नेहमीच सामोरं जावं लागतं. पण पारंपरिक शेतीसह फलोत्पादनचं धाडस हिवरखेडच्या राजेंद्र रंदे याने केलं आहे. राजेंद्र रंदे हे त्यांच्या नवीन प्रयोगात यशस्वी झाले आहेत. आपल्या शेतीत व्यावसायिक पिकांसोबत राजेंद्रनं काही पारंपरिक पिकंही लावली आहेत. वडिलोपार्जित सव्वादोन एकर शेतीत सफेद मुसळी तूर आणि झेंडुची फुलंही लावली आहेत. आपल्या शेती संदर्भात ल राजेंद्र सांगतो, " विदर्भला नवीन ओळख मिळवून देण्यासाठी मी हे केलं आहे. त्याची सुरुवात मी माझ्या वडिलोपार्जित शेतीपासूनच केली आहे. मोठ्या जिद्दीनं मी हे काम केलं आहे. ही स्ट्रॉबेरी आंतराष्ट्रीय बाजारपेठेत पाठवण्याचा माझा आहे. "200 रुपये किलोप्रमाणे सध्या स्थानिक पातळीवर विक्री करणार्‍या राजेंद्रला स्ट्रॉबेरीचं आकर्षक पॅकिंग करुन विदर्भातील बाजारपेढ काबीज करायची आहे. पारंपरिक शेतीकडून व्यवसायिक शेतीकडे वळण्याचा राजमार्ग राजेंद्रला साडला आहे.

close