इन्शुअरन्स सुधारणा बिल राज्यसभेत मांडलं

December 22, 2008 12:47 PM0 commentsViews: 5

22 डिसेंबर दिल्लीविरोधकांच्या गदारोळात राज्यसभेत इन्शुअरन्स कायद्यात सुधारणांसाठी बिल मांडण्यात आलं. यात इन्शुयरन्स क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूक 26 टक्क्यांवरून वाढवून 49 टक्के करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. पण डाव्या पक्षांचा या बिलला विरोध आहे. बिल माडतांना झालेल्या गदारोळात राज्यसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं. इन्शुअरन्स क्षेत्रातल्या कर्मचा-यांचाही या कायद्याला विरोध असून या बिलच्या विरोधात संपावर जाण्याचा इशारा एलआयसीच्या कर्मचा-यांनी दिला होता.

close