पशु वैद्यकीय डॉक्टर रस्त्यावर उतरले

December 22, 2008 10:59 AM0 commentsViews: 9

22 डिसेंबर नागपूरप्रशांत कोरटकर महाराष्ट्र मत्स्य आणि पशु वैद्यकीय विद्यापीठात झालेल्या भरतीमध्ये मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप होत आहे. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान याचाच सोक्षमोक्ष लावण्यासाठी राज्य भरातील तरुण रस्त्यावर बसले आहेत.नागपूरच्या विधिमंडळाच्या परिसरात गेल्या 8 दिवसापासून आपल्या मागणीसाठी रस्त्यावर बसले आहेत. इथले एक डॉक्टर सुरेंद्र सावरकर सांगतात, पशुवैद्यक शाखेत पीएचडी केल्यानंतर आपल्याला विद्यापीठात समाविष्ठ केला जाईल असं वाटलं होतं, पण चुकीचे निकष लावून पात्रता नसलेल्या व्यक्तीला निवडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच आंदोलकापैकी डॉ.सुरेद्र सावरकर ज्या उमेदवारांवर कोर्ट केसेस आहेत त्यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीत कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे.महाराष्ट्र पशु मत्स्य विद्यापीठात काही महिन्यांपूर्वी वेगवेगळ्या 750 पदांसाठी भरती करण्यात आली होती. नापास उमेदवार, तसंच कोर्टकेसेस असणा-यांचीही निवड करण्यात आली. विशेष म्हणजे सर्व नियम डावलून निवड झाल्यांचं सरकारी कागदपत्रांवरूनच स्पष्ट होत आहे. गरीब विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी शेती विकून शिक्षण घेतात, पण पात्रता असूनही वाटणीचा घास दुस-याच्या तोंडी जातो, त्याचं दु:ख अपार आहे. अधिवेशानादरम्यान आपल्या प्रश्नासाठी अनेकजण दिवस रात्र तळ ठोकून बसतात. मात्र माहितीच्या अधिकारातून खरी माहिती बाहेर येऊन सुध्दा सरकार आपली चूक मान्य करत नाही याची खंत मोठी आहे.

close