म्हाडाच्या घरांचं बुकिंग सुरू होतंय

December 22, 2008 3:56 PM0 commentsViews: 4

22 डिसेंबर मुंबईसाडेतीन लाखात मुंबई शहरात घर घ्यायचंय. तेही घाटकोपर,चेंबूर, सायन, गोरेगाव, मालाडसारख्या ठिकाणी तर फक्त आठवडाभर थांबावं लागेल. म्हाडा म्हणजे मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ घरांची एक योजना आणत आहे. म्हाडाच्या अर्जाची विक्री पुढच्या आठवड्यातच सुरू होईल. म्हाडाची घरं म्हणजे लो बजेट.मध्यमवर्गाला परवडणारी. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हाडाच्या बजेट हाऊसिंगच्या घरांचं बुकिंग सुरू होतंय. या नव्या फ्लॅट्सच्या फॉर्मच्या विक्रीपासून ते अलॉटमेंटपर्यंतची संपूर्ण जबाबदारी एचडीएफसी बँक उचलणार आहे. विक्रोळी, घाटकोपर,चेंबूर, सायन, वर्सोवा, गोरेगाव, मालाड आणि दहिसर या उपनगरातल्या फ्लॅटची किंमत 3.5 ते 50 लाखांपर्यंत असणार आहे. म्हाडाच्या घरांची बांधणीसुद्धा ग्राहकांच्या उत्पन्न गटाप्रमाणे करण्यात आली. कमी उत्पन्न गटासाठी चारशे स्क्वेअर फूट, मध्यम उत्पन्न गटासाठी 700 स्क्वेअर फूट आणि उच्च उत्पन्न गटासाठी 1000स्क्वेअर फूट जागा देण्यात येणार आहे. पण जे मुंबईचे रहिवासी आहेत त्यांनाचं ही जागा दिली जाणार आहे. त्यासाठी ग्राहकांना लॉटरीच्या प्रक्रियेतून जावं लागेल.

close