वर्धा जिल्ह्यात दारूबंदीचे तीनतेरा

December 22, 2008 2:03 PM0 commentsViews: 71

22 डिसेंबर वर्धानरेंद्र मतेवर्धा जिल्हा हा राज्यातला पहिला दारूबंदी जिल्हा. पण राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाकर्तेपणामुळे या जिल्ह्यातली दारूबंदी पूर्णपणे मोडीत निघाली आहे.महात्मा गांधींचा सेवाग्राम आश्रम आणि विनोबा भावेंच्या पवनार आश्रमामुळे सरकारनं 1972 साली वर्धा जिल्ह्यात दारूबंदी लागू केली. पण जिल्ह्यात ठिकठिकाणी कुठे हातभट्टीची तर कुठे विदेशी दारूची सर्रास विक्री होतं आहे. यासाठी राजकारणी आणि पोलीस यंत्रणाच जबाबदार असल्याचा आरोप होतं आहे. पोलिसांच्या रेकॉर्डनुसार, चालू वर्षात जानेवारी ते नोव्हेंबरपर्यंत 2,43,59,501 रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली. तर 9,889 आरोपींना अटक केली आहे. आयबीएन-लोकमतच्या हाती लागलेल्या कागदपत्रानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग सरकारला खोटी आकडेवारी सादर करतं. उदाहरण द्यायंच झालं तर, वर्धा तालुक्यात चालू वर्षात दारूच्या 96 प्रकरणांमध्ये 21 लोकांना अटक, तर 3,46,725 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तसंच आर्वी तालुक्यात दारूच्या 57 गुन्ह्यांमध्ये 16 लोकांना अटक, तर 2,3, 145 रुपयांची दारू जप्त करण्यात आली.साहजिकच ही आकडेवारी बोगस असल्याचा दावा सत्ताधारी पक्षाच्याच स्थानिक आमदारांनी केला आहे. सरकारी अनास्था इतकी पराकोटीला गेलीय की हिवाळी अधिवेशनात वर्धा जिल्ह्याच्या दारूबंदीवरील लक्षवेधीसुद्धा फेटाळली गेली आहे.महात्मा गांधींच्या या सेवाग्राम आश्रम आणि पवनार आश्रम असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावाला उरली आहे.

close