साकीब नाचण करणार अतिरेक्यांचे दफनविधी

December 22, 2008 4:13 PM0 commentsViews: 3

22 डिसेंबर ठाणेमुंबईत मारल्या गेलेल्या अतिरेक्यांना दफन करण्यासाठी मुंबईत जागा दिली जाणार नाही, अशी भूमिका मुंबईतल्या तमाम मुस्लीम संघटनांनी घेतली होती. मुंबई पोलिसांच्या ताब्यात 9 दहशतवाद्यांचे मृतदेह आहेत. पण यांच्या दफनविधी करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हता. पण आता साकिब नाचण पुढे आला आहे. साकिब 2003 सालच्या मुलुंड लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी अटकेत आहे. मुंबईत मारल्या गेलेल्या 9 अतिरेक्यांचे मृतदेह दफनविधीसाठी आपल्याला द्यावेत, अशी मागणी त्यानं मोक्का न्यायालयात केली होती. 'मी स्वत: काझी आहे, माझा पडघ्यात भूखंड आहे, दहशतवाद्यांच्या मृतदेहाचा दफनविधी मी स्वत: करीन' असं त्यानं अर्जात म्हटलं होतं. परंतु मोक्का न्यायालयानं त्याची ही विनंती धुडकावून लावली आहे.दरम्यान पडघ्यातल्या रहिवाशांनीही साकीबचा हा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी अतिरेक्यांचं दफन करण्यासाठी ठाम विरोध केला आहे.

close