सायानाच्याही स्वागताला एकही अधिकारी हजर नव्हता

December 22, 2008 4:23 PM0 commentsViews: 5

22 डिसेंबरभारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल वर्ल्ड सुपर सीरिजमधल्या शानदार कामगिरीनंतर पहाटे भारतात परतली. पण हैद्राबाद विमानतळावर तिच्या स्वागताला बॅडमिंटन फेडरेशनचा एकही अधिकारी हजर नव्हता. मलेशियात झालेल्या वर्ल्ड सुपर सीरिज स्पर्धेत सायनाने तिच्यापेक्षा वरच्या रँकिंगवर असलेल्या खेळाडूंना हरवत सेमी फायनलमध्ये धडक मारली. पण तिच्या कामगिरीची दखल फेडरेशनने घेतलेली दिसत नाही. या स्पर्धेला जाण्यापूर्वी सायनाला पासपोर्ट मिळण्यातही अडचणी आल्या होत्या. मीडियाने केलेल्या हस्तक्षेपामुळे त्यावेळी तिला पासपोर्ट मिळाला होता.

close