एमएमआरडीएच्या अधिका-यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

December 22, 2008 5:06 PM0 commentsViews: 1

22 डिसेंबर मुंबईअजित मांढरेएमएमआरडीएचे महानगर सहआयुक्त आणि एमयुटीपीचे संचालक मिलिंद म्हैसकर आणि पुनर्वसन आणि पुर्नवसाहत प्रमुख वंदना सुर्यवंशी यांच्या विरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ल्ड बँकेच्या सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड प्रकल्पांतर्गत त्यांनी केलेल्या कारवाई संदर्भात त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ल्ड बँकेच्या साह्यायाने एमयुटीपीच्या अंतर्गत एमएमआरडीए सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड हा प्रकल्पावर 2003 पासून काम करीत आहे. या प्रकल्पाच्या मार्गात कुर्ला पश्चिम इथलं ताराबाई कंपाऊण्ड येतं होतं. 24 नोव्हेंबरच्या दिवशी एमएमआरडीएनं ताराबाई कंपाऊंडवर अचानक कारवाई केली. कारवाई करत असताना शंकर भल्ला या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. ह्या प्रकरणात कुर्ला कोर्टाच्या आदेशानंतर कुर्ला पोलीस ठाण्यात एमएमआरडीएचे महानगर सहआयुक्त आणि एमयुटीपिचे संचालक मिलिंद म्हैसकर आणि पुनर्वसन आणि पुर्नवसाहत प्रमुख वंदना सुर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एमएमआरडीएच्या अधिकीरी वंदना सुर्यवंशी यांनीच ही कारवाई केली असून या संदर्भात कोणत्याही प्रकारची पुर्वसूचना अथवा नोटीस दिली नाही, असा आरोप ताराबाई कंम्पाऊंण्डचे मालक बळीराम थोरात यांनी केला आहे. या प्रकणात तक्रार दाखल झाल्यानंतर कुर्ला पोलिसांनी जीसीपी ऑपरेटरला अटक केली आहे. याप्रकरणी पुढचा तपास चालू आहे.

close