दहशतवाद्यांच्या हल्ल्यातच करकरेंचा मृत्यू झाला

December 22, 2008 5:53 PM0 commentsViews: 92

22 डिसेंबर मुंबईहेमंत करकरेंच्या मृत्यू प्रकरणी क्राईम ब्रँचनं आपला अहवाल सरकारला सादर केला. यात हेमंत करकरेंना 4 गोळ्या लागल्या होत्या आणि त्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातच करकरेंचा मृत्यू झाला असं या अहवालात म्हटलं आहे. हेमंत करकरेंच्या मृत्यूविषयी केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री ए. आर. अंतुलेंनी संशय व्यक्त केला होता. मात्र आता मुंबई क्राईम ब्रँचनं राज्य सरकारला दिलेल्या अहवालात करकरेंची हत्या ही अतिरेक्यांनी केल्याचं आता स्पष्ट झालयं. त्यामुळे अंतुलेंनी घेतलेल्या भूमिकेवर मुंबईतल्या वरिष्ठ पोलिसांनी नाराजी व्यक्त केली आहे

close