निकोलाय ठरला नवा बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियन

December 22, 2008 6:07 PM0 commentsViews: 2

22 डिसेंबर रशियाचा महाकाय बॉक्सर निकोलाय जागतिक बॉक्सिंग महासंघाचा हेविवेट वर्ल्ड चॅम्पियन ठरला.अपेक्षेप्रमाणे त्यानं चार वेळा हेवीवेट चॅम्पियन ठरलेल्या अमेरिकेच्या 46 वर्षीय इव्हान्डर होलिफिल्डचा गुणांवर पराभव केला. उंची 7 फूट बॉक्सिंगचा हेवीवेट वर्ल्ड चॅम्पियन. 52 पैकी 50 मॅचमध्ये विजय. ही ओळख आहे रशियाच्या महाकाय बॉक्सर निकोलाय व्हॉल्युएव्हची. बॉक्सिंगचा बेताज बादशहा इव्हाण्डर होलिफ्लिडचा निकोलायनं सहज पराभव केला आणि बॉक्सिंग जगतातील सगळ्यात उंच आणि धिप्पाड विश्वविजेता होण्याचा बहुमानही पटकावला. निकोलाय बॉक्सिंगकडे वळला तो विसाव्या वर्षी. त्याआधी त्यानं बास्केटबॉल आणि थाळीफेकीत आपला दबदबा निर्माण केला होता. बॉक्सिंग कोच ओलेग शालेव्हनं त्याला बॉक्सिंगकडे वळवलं आणि मग त्यांनं मागे वळून पाहिलंच नाही. तरुणपणी रानडुकराची नुसत्या हातानं शिकार करण्यासाठी निकोलाय प्रसिध्द होता. हातात बॉक्सिंगचे ग्लोज चढवल्यावर तर त्याला रोखणं अशक्यचं.पण या निकोलायलाही उझबेकिस्तानच्या रुसलान चॅगेव्हनं एकदा पराभूत केलं होतं.

close