26/11 तील सर्व अतिरेकी पाकिस्तानीच – कसाब

December 23, 2008 4:48 AM0 commentsViews: 1

23 डिसेंबरमुंबई हल्ल्यावेळी ठार झालेले सर्व अतिरेकी पाकिस्तानीच असल्याचं अजमल कसाबनं एका पत्रात कबूल केलं आहे. हे पत्र भारतानं पाकिस्तानच्या हाय कमिशन कडे पाठवलंय. आपल्या सहकार्‍यांचे मृतदेह पाकिस्ताननं ताब्यात घ्यावेत आणि त्यांच्यावर पाकिस्तानातच विधीपूर्वक अंत्यसंस्कार करावेत, अशी विनंती कसाबनं या पत्रात केली आहे. पाकिस्तानी हाय कमिशनची भेट मिळावी, अशी इच्छाही त्यानं या पत्रामध्ये व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाने कसाबचं पत्र पाकिस्तानी हाय कमिशन कडे पाठवलं आहे. या पत्रातला तपशील तपासून पहाणार असल्याचं पकिस्तानी परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते मोहम्मद सादिक यांनी म्हटलेय. दरम्यान इंटरपोलच्या पाच अधिकार्‍यांच्यां पथकाने कसाबच्या तपासाबाबत मुंबईचे जॉइंट पोलिस कमिशनर राकेश मारिया यांची भेट घेतली.

close