कसाबला फासावर चढवा – शिवसेनाप्रमुख

December 23, 2008 5:01 AM0 commentsViews: 2

23 डिसेंबर, मुंबईनुसत्या समित्या नेमू नका आणि कसाबला ताबडतोब फासावर चढवा अशी मागणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. देशाच्या सरहद्दी फाटल्या असताना मेणबत्त्या लावून पुचाट आंदोलनं कसली करता ? असं विचारून त्यांनी या आंदोलनाची खिल्ली उडवलीय. दैनिक सामनाच्या मुलाखतीच्या दुसर्‍या भागात त्यांनी आपले परखड विचार स्पष्ट केले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनी अनेक खळबळजनक मतं या मुलाखतीत व्यक्त केली आहेत. हिंदूंचा दहशतवाद असता, तर मला बरं वाटलं असतं, असं स्पष्ट आणि परखड मत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. साध्वी प्रज्ञा आणि पुरोहितचा पोलिसांनी हकनाक छळ चालवल्याचंही शिवसेनाप्रमुखांचं म्हणणं आहे. शिवसेनेत नसतो, तर आपलं एन्काउंटर झालं असतं, अस खुद्द नारायण राणेंनीच आपल्याला सांगितलं होतं, मात्र नंतर ते कृतघ्न झाले,असंही शिवसेनाप्रमुखांनी या मुलाखतीत म्हटलंय.

close