धुक्यामुळे मोहाली टेस्ट उशीरा सुरू होणार

December 23, 2008 5:06 AM0 commentsViews: 6

23 डिसेंबर, मोहालीमोहाली टेस्टचा आज पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. पण धुक्यामुळे आजही मॅच वेळेवर सुरु होऊ शकलेली नाही. मंगळवार सकाळपासूनच मैदानावर दाट धुक्याचं आवरण आहे. पीच कोरडं ठेवण्याचे ग्राऊंडस्टाफचे प्रयत्न सुरु आहेत. अंपायरही मैदानाची पाहणी करत आहेत. या टेस्टमध्ये प्रत्येक दिवशी धुक्यामुळे खेळात व्यत्यय आला आहे. दरम्यान दुसर्‍या इनिंगमध्ये भारताकडे 285 रन्सची आघाडी आहे. आणि सहा विकेट्स भारताच्या हातात आहेत. पण आज सगळ्यांचं लक्ष असेल ते भारतीय बॉलर्सच्या कामगिरीवर. टेस्ट जिंकण्यासाठी इंग्लंडच्या दहा विकेट्स लवकरात लवकर घेण्याचं आव्हान त्यांच्यासमोर आहे. त्यापूर्वी सगळ्यांचं लक्ष असेल ते कॅप्टन धोणी भारताची इनिंग कधी घोषित करतो याकडे.

close