अंतुलेंच्या राजीनाम्यावर काँग्रेस हाय कमांडची चर्चा

December 23, 2008 6:04 AM0 commentsViews: 1

23 डिसेंबर, दिल्लीआशिष दीक्षितमंगळवारी काँग्रेस अल्पसंख्याक मंत्री अंतुले यांच्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये त्यासंदर्भात काँग्रेस पक्षाची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत करकरेंच्या मृत्युची कोणतीही, चौकशी न करण्यावरशिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय. अंतुलेंना हा निर्णय मान्य असेल , तर त्यांचं मंत्रीपद शाबूत राहील. नाहीतर आज संध्याकाळपर्यंत पंतप्रधान त्यांचा राजीनामा मंजूर करतील, असंही बोललं जात आहे. लोकसभेतही आज प्रणव मुखर्जी,अंतुलेंच्या वक्तव्यावर सरकारतर्फे उत्तर देणार आहेत. दरम्यान अंतुलेंच्या विधानावरून निर्माण झालेला वाद संसदेत सुरूच आहे. गेले कित्येक दिवस सरकार आणि विरोधक एकत्र येऊन दहशतवादावर चर्चा करत होते. पण संसदेतलं सोमवारचं चित्र मात्र कमालीचं वेगळं होतं. अंतुलेंचा राजीनामा मागत भाजपने सोमवारी लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमधलं कामकाज चालू दिलं नाही. विरोधकच कशाला.. स्वतः पंतप्रधानांपासून.. मुखर्जी, अ‍ॅंटनी आणि चिदंबरम यांच्यासारख्या सरकारमधल्या ज्येष्ठ नेत्यांना वाटतं की पाकिस्तान अंतुलेंच्या विधानांचा भारताविरुद्ध वापर करत आहे. पण कॉंग्रेस पक्ष मात्र अंतुलेंना हटवण्याच्या विरोधात आहे. कारण तसं केलं तर अल्पसंख्यांक मतदार दुखवला जाऊ शकतो.सरकार विरुद्ध पक्ष असं भाडण सुरू असल्याने स्वतः अंतुले मात्र निर्धास्त आहेत. त्यांनी माफी मागण्यास किंवा कोणतेही स्पष्टीकरण देण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे. लालुप्रसाद यादव, रामविलास पासवान या मित्रपक्षातील नेत्यांसह काँग्रेसमधील काही नेतेही अंतुलेंच्या पाठीशी असल्याचं बोललं जात आहे. अशा परिस्थितीत सरकार या मुद्द्यावर संसदेत काय स्पष्टीकरण देते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close