ड्रग्जच्या तस्करीसाठी सीमेवर खोदलं भुयार

December 23, 2008 6:14 AM0 commentsViews: 6

23 डिसेंबर, जोधपूरभारत वारंवार पाकिस्तानला दहशतवाद्यांचे पुरावे देत आहे. दहशतवाद्यांची यादीही देत आहे. पण पाकिस्ताननं यावर कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यात आता भारत-पाक बॉर्डरवरून अंमली पदार्थाच्या होत असलेल्या तस्करीचा पुन्हा पर्दाफाश झालाय. पाकिस्तानी ड्रग्ज माफियांनी बॉर्डरवरून भुयार खोदून ड्रग्जची डिलिवरी भारतात पोहचवली आहे. या प्रकारामुळं बॉर्डरवरील सुरक्षा यंत्रणेचं पितळ उघडं पडलंय. भारतासाठी हा आणखी एक इशाराच आहे. राजस्थानातल्या पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बाडमोरमध्ये हेरॉईनची तस्करी उघडकीस आली आहे. जोधपूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी टांझानियाच्या 3 नागरिकांना 20 किलो हेरॉईनसह बसस्टँडवर अटक केली होती. तिधांची चौकशी केल्यानंतर सालेम नावाच्या पाकिस्तानातल्या तस्करानं भुयार खोदून 20 किला हेरॉइन भारतातल्या तस्करांजवळ पोहोचवलं, त्यानंतर हे या तिघांकडे देण्यात आलं अशी माहिती मिळाली. हे तिघं हेरॉईन साऊथ आफ्रिकेला पाठवणार होते.एडम गोडाविल, मोहम्मद उमर आणि मोहम्मद युसुफ अशी या तीन टांझानियन नागरिकांची नावं आहेत. अनेक वर्षे हे तस्करीच्या धंद्यात आहेत. विशेष म्हणजे हे तिघे स्टुंडंट्स व्हीजावर भारतात रहात होते. याच भुयारातून हेरॉइनसारख्या अंमली पदार्थांसोबत बनावट नोटा आणि खतरनाक हत्यारांचा व्यापार बिनबोभाटपणे सुरू होता. पकडलेल्या तिघांचे पाकिस्तानातल्या ड्रग्ज माफियाशी चांगले संबंध आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या मदतीशिवाय हे भुयार खोदणं शक्य झालं असेल का, असाही प्रश्न यामुळे उपस्थित झालाय. ड्रग्ज माफियांनी बॉर्डरवर खोदलेल्या भुयारामुळं भारत-पाक सीमेच्या सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उभे निर्माण झाले आहेत.

close