यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी कुटुंबाची परवड

December 23, 2008 3:43 AM0 commentsViews: 95

23 डिसेंबर, यवतमाळभास्कर मेहरेदुधगावच्या लक्ष्मीबाईच्या 14 वर्षांच्या मुलीला एका राजस्तानी परिवारान विकत मागितलं. तिने नकार देताच या मुलीला पळवून नेण्यात आलं. पोलिसांच्या कारवाईमुळं तिची सुटका झाली पण गावकर्‍यांनी चक्क या मुलाच्या पावित्र्याबद्दलच संशय घेउन , या कुटुंबाचा छळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळ नाईलाजानं या आदिवासी कुटुंबाला जंगलात जाऊन राहाव लागतय. तिथ ना धड प्यायला पाणी आहे, ना हाताला काम.जबरदस्तीनं लग्न लावण्यात आलेली ही मुलगी अजूनही तिला झालेल्या मानसिक आणि शारीरिक छळाच्या धक्क्यातून सावरलेली नाहीये. आपला शारीरिक आणि मानसिक छळ झाल्याचं तसंच सतत मारीन टाकण्याच्या आणि विकून टाकण्याच्या धमक्या देण्यात आल्याचं या मुलीनं सांगितलं.या कुटुंबाच्या नातेवाईकांनाही गावकरी धमकावतात. आदिवासी राखीव मतदारसंघ असलेल्या या भागाचे पालकमंत्री वसंत पुरके आहेत. पण त्यांनीही या प्रकाराकडं दुर्लक्षच केल्याचा आरोप होत आहे. "वसंत पुरकेंना या सगळ्या प्रकाराची जाणीव आहे. मात्र आपले राजकीय नुकसान होऊ नये यासाठी ते जाणूनबुजून या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आहेत" असा आरोप विलास वानखेडे या सामाजिक कार्यकर्ते विलास वानखेडे यांनी केला.उपेक्षितांच्या विकासाच्या सरकार कितीहा गप्पा मारत असले, तरी समाजातआजही त्यांच्यावर प्रचंड अन्याय होत आहे आणि त्याची राज्यकर्ते दखलंही घेत नाहीत, हेच यानिमित्तानं पुन्हा एकदा समोर आलं आहे. अक्षरशः मरणयातना भोगणार्‍या या परिवाराकडं आता सरकार लक्ष देणार का हाच प्रश्न आहे.

close