मोहाली टेस्टमध्ये गंभीरची हाफ सेंच्युरी

December 23, 2008 7:07 AM0 commentsViews: 3

23 डिसेंबर, मोहाली मोहाली टेस्टमध्ये सकाळी पडलेल्या दाट धुक्यामुळे पाचव्या दिवसाचा खेळ अडीच तास उशीरा म्हणजे साडेअकरा वाजता सुरू झाला. पण भारताचा कॅप्टन महेंद्र सिंग धोणीने इनिंग लगेच घोषित न करता बॅटिंग चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टेस्ट ड्रॉ होण्याचीच शक्यता जास्त आहे. कालच्या चार विकेटवर 134 रन्सच्या स्कोअरपासून भारताने आपली दुसरी इनिंग पुढे सुरू केली. गंभीर आणि युवराज सिंग यांनी आपल्या हाफ सेंच्युरी पूर्ण केल्या आहेत. दोघांनी पाचव्या विकेटसाठी सेंच्युरी पार्टनरशिपही केली आहे. भारताकडे आता साडेतीनशेपेक्षा जास्त रन्सची आघाडी आहे. पण रनरेट अजूनही ओव्हरमागे दोन रन्सपेक्षा थोडाच जास्त आहे. आजच्या दिवसात 68 ओव्हर्सचा खेळ व्हायचा आहे.

close