अंतुलेंच्या विधानावरून संसदेत हंगामा

December 23, 2008 7:23 AM0 commentsViews: 1

23 डिसेंबर, दिल्लीअल्पसंख्यंक मंत्री ए. आर. अंतुले यांनी हेमंत करकरे यांच्या मृत्यसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून विरोधकांनी मंगळवारी सकाळी संसदेच कामकाज रोखून धरलं. अंतुले यांनी यापूर्वीच राजीनामा दिला आहे, तो तात्काळ स्वीकारला जावा अशी विरोधकांची मागणी आहे. अंतुलेंच्या विधानासंदर्भात सरकारतर्फे स्पष्टीकरण देण्यासाठी पी. चिदंबरम संसदेत उभे रहाते, मात्र त्यांचे स्पष्टीकरण ऐकण्यास नकार देत भाजप सदस्यांनी सभात्याग केला. या गोंधळानंतर संसदेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.दरम्यान करकरे यांचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यातच झाल्याचं गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांच्या मृत्यूसंदर्भात कोणत्याही शंका उपस्थित करणे खेदजनक असल्याचं ते म्हणाले.

close