अंतुलेंची माघार

December 23, 2008 8:11 AM0 commentsViews: 9

23 डिसेंबर, दिल्लीहेमंत करकरे यांच्या मृत्यूप्रकरणी केलेल्या वादग्रस्त विधानावर अल्पसंख्यांक मंत्री ए. आर. अंतुले यांनी माघार घेतली आहे. 'गृहमंत्र्यांनी संसदेत दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आणखी कोणत्याही चौकशीची गरज नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.' याच वेळी माझ्या देशप्रेमावर शंका घेऊ नका, असंही त्यांनी सांगितलं.करकरेंच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी अंतुले यांनी केली होती. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना करकरेंचा मृत्यू दहशतवादी हल्ल्यातच झाला असून त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची गरज नसल्याचे गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी स्पष्ट केलं होतं. तसंच करकरेंच्या हौतात्म्यावर शंका घेणं खेदजनक असल्याचं म्हटलं होतं. यानंतर अंतुले यांनी गृहमंत्र्यांच्या वक्तव्यावर समाधानी असल्याचं सांगत आणखी कोणत्याही चौकशीची गरज नसल्याचं स्पष्ट केलं आहे."करकरेंच्या हौतात्म्यावर मी कोणतीही शंका घेतली नव्हती. दहशतवाद्यांच्या गोळ्यांमुळेच करकरे यांना वीरमरण आलं, याविषयी माझ्या मनात कोणतीही शंका नाही. मात्र ताज किंवा ओबेरॉय सोडून त्यांना कामा हॉस्पिटलच्या दिशेने काणी पाठवले ? एवढाच प्रश्न मी विचारला होता. मात्र माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. माझ्यावर पाकिस्तानी एजंट असल्याचा ठपका ठेवला गेला. माझ्या देशप्रेमावर कोणी शंका घेऊ नये" असं अंतुले म्हणाले.दरम्यान विरोधी पक्षांनी अंतुलेंच्या राजीनाम्याचा मुद्दा लावून धरला आहे. विरोधकांनी या मुद्द्यावरून संसदेत घातलेल्या गोंधळामुळे लोकसंभेचं कामकाज दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं होतं. अंतुले यांनी यापूर्वीच राजीनामा दिला असला, तरी काँग्रेसनं तो अद्याप स्वीकारलेला नाही. मात्र आता अंतुले यांनी माघार घेतल्यामुळे राजीनामा स्वाकारायचा झाल्यासतो कोणत्या मुद्द्यावर स्वीकारायचा? असा पेच काँग्रसपुढे उभा राहिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या भूमिकेवर सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close