रोह्याच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सोयींचा अभाव

December 23, 2008 10:37 AM0 commentsViews: 5

23 डिसेंबर रोहा श्वेता पवारविषारी दारू पिऊन विषबाधा झालेल्या देवकान्हे गावातल्या रुग्णांना आधी रोह्याच्या हॉस्पिटलमध्ये तातडीनं अ‍ॅडमिट करण्यात आलं. पण रोह्याच्या हॉस्पिटलमध्ये पुरेशा सोयी नाहीत. या रुग्णांना देण्यात आलेल्या सलाईनमध्ये बुरशी होती. विषारी दारू पिऊन विषबाधा झालेल्या रुग्णांमध्ये देवकान्हे गावातले चंद्रकांत काणेकर हेही आहेत. सोमवारी सकाळी ते घराशेजारच्या शेतात बेशुद्धावस्थेत सापडले. त्यांना रोह्याच्या हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करण्यात आलं. पण इथे त्यांना वेळेवर उपचार मिळू शकत नाहीत. रोहे हे रायगड जिल्ह्यातलं मध्यवर्ती ठिकाण. पण इथल्या हॉस्पिटलमध्ये आपत्तीच्या वेळी पुरेशी वैद्यकीय मदत मिळत नाही. रोह्याच्या हॉस्पिटलमध्ये या दुर्घटनेत सापडलेल्या आणखी काही रुग्णांना अ‍ॅडमिट करण्यात आलं आहे. पण पुरेशी सोय नसल्यामुळे त्यांना मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये हलवावं लागणार आहे.

close