आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आमदारांचं आंदोलन सुरू

December 23, 2008 2:50 PM0 commentsViews: 12

23 डिसेंबर नागपूरमराठा समाजाचा ओबीसीत समावेश करण्यासाठी, सर्वपक्षीय आमदारांनी नागपूर अधिवेशनात धरण आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनात सर्वपक्षातले मराठा आमदार सहभागी झाले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशी त्यांची मागणी आहे. ज्यावेळी विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला आपलं सरकार पूर्ण सहकार्य करेल असं सांगितलं होतं. आता मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत नेमलेल्या बापट आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देऊ नये असा अहवाल सादर केला होता. त्याला महाराष्ट्रातील सर्व पक्षीय आमदारांनी विरोध केला. बापट समितीच्या अहवालानुसार सुप्रिम कोर्टाच्या निर्णयानुसार आरक्षणाची मर्यादा 52% टक्क्यांच्यावर वाढवता येणार नाही. त्यामुळे जरी आमदारांचा पाठिंबा असला तरी आरक्षण देणार कसं? हा नवा पेच निर्माण झाला आहे.

close