द्रविड रणजीमध्ये खेळणार

December 23, 2008 4:03 PM0 commentsViews: 10

23 डिसेंबर कर्नाटकपाकिस्ताविरुध्दचा दौरा रद्द झाल्यामुळे सध्या क्रिकेटपटूंना चांगलीच सुट्टी मिळाली आहे. पण द वॉल द्रविडला मात्र ही सुट्टी सत्कारणी लावायची आहे.कर्नाटककडून रणजी मॅच खेळण्यास तो सज्ज झाला आहे. कर्नाटकाच्या रणजी टीममध्ये द्रविडचा समावेशही करण्यात आला आहे. 26 डिसेंबरपासून 29 डिसेंबरपर्यंत कर्नाटक सौराष्ट्रसोबत मुंबईमध्ये मॅच खेळणार आहे. स्थानिक स्पर्धांमध्ये खेळून द्रविडला त्याचा हरवलेला फॉर्म परत मिळवायला मदत होईल असं निवड समितीचे अध्यक्ष श्रीकांतनं त्याला सुचवलं होतं. पण त्याआधीच द्रविडनं मोहालीत सेंच्युरी ठोकत आपण फॉर्मात आल्याचं दाखवून दिलं होतं. तरीही द्रविडनं श्रीकांतचा सल्ला आता मनावर घेतलेला दिसतोय.

close