आयपीएलची ट्रेडिंग विंडो सुरू झाली

December 23, 2008 4:44 PM0 commentsViews: 1

23 डिसेंबर इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलचा दुसरा सिझन सुरू होतोय. आणि प्लेअर्सची खरेदी-विक्रीची चर्चा आत्तापासूनच सुरू झाली आहे. बंगलोर रॉयल लेंजर्स टीमचे मालक विजय माल्या यांनी त्यांची अख्खीच्या अख्खी टीम विकायला काढल्याची बातमी पसरली होती. पण अखेर खुद्द विजय माल्या यांनीच ही बातमी अफवा असल्याचं स्पष्ट केलं. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात अतिशय खराब कामगिरीमुळे बंगलोर रॉयल चॅलेंजर्सची टीम 7व्या स्थानावर फेकली गेली. आणि त्यानंतर टीमचे मालक विजय माल्या यांनी जाहीरपणे कॅप्टन राहुल द्रविडसह अख्ख्या टीमचे वाभाडे काढले होते. त्यामुळे आयपीएल ट्रेडिंग विंडो पुन्हा सुरू झाल्यावर, माल्यांनी आपली टीमच विकायला काढलीय अशी बातमी आली तेव्हा कोणालाही आश्चर्य वाटलं नाही. पण माल्या यांनी मात्र लगेचच ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. मल्ल्यांनी सांगितलं की, बंगलोर रॉयल चॅलेंजर्स टीम विकण्याचा माझा कोणताही इरादा नाही. सध्याच्या टीममधले 3 परदेशी खेळाडू मात्र आम्हाला बदलायचे आहेत. त्यांच्या जागी इतर टीममधले 3 खेळाडू विकत घ्यायचा आमचा प्रयत्न असेल. ते जमलं नाही तर भारतातलेच तरुण क्रिकेटर करारबद्ध करून टीमचा ढासळलेला समतोल सावरण्याचा आमचा प्रयत्न असेल. त्यामुळे पुढच्या लिलावात आमचा सहभाग लक्षणीय असेल एवढं नक्की. दरम्यान, आयपीएलमधले अनेक फ्रेन्चाईजी आपले प्लेअर्स विकायला तयार झालेत, असं सूत्रांकडून सांगण्यात येतंय. खरेदी-विक्री होणा-या प्लेअर्ससंदर्भातली लिस्ट पुढच्या काही दिवसांत आपल्याला मिळेल.

close